ड्यु-प्लेसिसवर शक्यता कारवाई होण्याची शक्यता

 इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायभूमीत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी मात दिली. चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १९१ धावांनी पराभव केला; पण या कसोटीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ-ड्यु-प्लेसिस आणि जोस बटलर यांच्यात वादावादी झाल्याने इंग्लंडच्या विजयाला गालबोट लागले. या शाब्दिक वादावादीचे पर्यावसन अंगावर धावून जाण्यात झाल्याने आयसीसी या प्रकरणी फाफ-ड्युप्लेसिसवर कारवाई करण्याची शक्यता आहे. हा वाद कसोटीच्या चौथ्या दिवशी सॅन करेनचा थो फाफच्या पायाला लागल्यानंतर घडला. त्यावेळी फाफ आणि डुसेन फलंदाजी करीत होते. यावेळी क्षेत्ररक्षक आणि फाफनध्ये शाब्दिक वाद झाला.. त्यानंतर खेळाडू एकमेकांकडे आक्रनकपणे चालत आले. त्यावेळी ब्रॉडबरोबर वाद होण्यापूर्वी फाफ बटलरच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत होते. या घटनेनंतर आयसीसी फाफवर कारवाई करण्याची शक्यता आहे. अशाप्रकारची वर्तणूक आयसीसीच्या 'कोड ऑफ कंडक्ट' चे उल्लंघन करते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना कर्णधार फाफ-ड्युप्लेसिस म्हणाला, 'खेळातील काही गोष्टीत मी सामील होत असतो. हा माझा गुणधर्मच आहे. संघाचे नेतृत्व करताना असा आक्रमकपणा दाखवावा लागतो. तुम्ही मागे नाही हे दाखवून देण्यासाठी हे करावे लागते. याचा अर्थ मी वाद घालण्यात आग्रही असतो असे नाही. त्याने मला उद्देशून काही टिप्पणी केली मी त्याला फक्त प्रत्युत्तर दिले.' फाफ पुढे म्हणाला, 'मला नाही वाटत की आम्ही दोघांनी एकमेकांना स्पर्शही केला असेल. शाब्दिक देवाण-घेवाण माझ्यात आणि ब्रॉडी (स्टुअर्ट ब्रॉड) मध्ये सुरू होती.