मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांची सुरक्षा व शाळांमध्ये सुरु असलेल्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या ११८० शाळांचे प्रवेशद्वार, कॉरिडोरसह अन्य जागांवर ४ हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. या योजनेस महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच यासंदर्भातील निविदा काढण्यात येणार आहे.अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलिल यांनी शिक्षण समितीच्या वैठकीत शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात १ हजार सीसीटीव्ही वसवले जाणार आहेत. शिक्षण समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. खेरवाडी महापालिकेच्या शाळेतील शिक्षिकांना अश्लिल मेसेज व फोटो पाठवणाऱ्या गंगाप्रसाद तिवारी याला निलंबीत करण्यात आले आहेमहापालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी यासंदर्भातील जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की१५ नोव्हेंबर २०१९ रोजी मिळालेल्या अहवालाच्या आधारे तिवारी याला निलंबीत करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या आपल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे