विनाअनुदानित व अंशतः विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी १ फेब्रुवारी २०२० रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन केले जाणार आहे. राज्यभरातील सात हजार शाळांमधील सुमारे ७५ हजार शिक्षक आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. म गील ५ वर्षांत फक्त २० टक्के अनुदानावर युती सरकारने बोळवण केली. महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा असताना उपमुख्यमंत्र्यांनी फेरशाळा तपासणीचे आदेश दिले आहेत. हा दिलेल्या आश्वासनाप्रति विरोधाभास व अन्याय आहे. १ फेब्रुवारी रोजी विनाअनुदानित शाळा वंद ठेवण्यात येतील. राज्यातील सर्व शिक्षक उपसंचालक कार्यालयांसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात संस्थाचालक महामंडळ, मुख्याध्यापक महामंडळ, शैक्षणिक व्यासपीठ व राज्यातील अनेक संघटनांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनात पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे ते म्हणाले.
राज्यातील विनाअनुदानित शाळा १ फेब्रुवारीला बंद